
जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना येण्यास बंदी
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. अगदी अत्यावश्यक कामासाठी प्रवेश हवा असल्यास कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक असून, चाचणी निगेटिव्ह असल्यासच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
www.konkantoday.com