
कोरोनरी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मुलासह पळून गेलेल्या दाम्पत्याला आरोग्य कर्मचार्यानी ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटरमध्ये दाखल केले
काेराेनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून पळून गेलेल्या दाम्पत्याला त्यांच्या मुलांसह आरोग्य कर्मचार्यानी ताब्यात घेऊन काेविड सेंटरमध्ये दाखल केलं आहे हा प्रकार दापोली तालुक्यातील पिसई आरोग्य केंद्रात घडला आहे
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी करोनाचे टेस्ट सक्तीचे केल्याने हे जोडपे आपल्या मुलासह तपासणीसाठी दापोली तालुक्यातील पिसई आरोग्य केंद्रात आले होते त्यांची तपासणी केली असता ते तिघेही पॉझिटिव्ह आले दरम्यान या जोडप्याने कोणालाही न सांगता तेथून मोटारसायकलने पलायन केले ही बाब लक्षात आल्यावर आरोग्य कर्मचार्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला सदरचे जोडपे आपल्या मुलासह दापोलीतील काळकाई कोंड परिसरात आढळून आले त्यांना आरोग्य कर्मचार्यांनी ताब्यात घेऊन कृषी विद्यापीठाच्या काेव्हिड सेंटरमध्ये दाखल केले आहे
www.konkantoday.com