डेरवण येथील ड्रीम हेल्थ पार्कला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, १५ हजार विद्यार्थी आणि खेळाडूंची भेट


श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालये ड्रीम हेल्थ संकल्पना प्रत्यक्षात उतरवून त्याचे उदघाटन २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. टी. रामासामी (पद्मविभूषण) यांच्या हस्ते करण्यात आले.
हे संग्रहालय प्रशस्त अशा १६०० चौ. मी. जागेत उभारण्यात आले आहे. जेणेकरून १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हसत खेळत त्याचा आस्वाद घेता येईल आणि योग्य माहिती मिळेल. बालपणात घडलेले संस्कार, सवयी या कायमस्वरूपी मनावर कोरल्या जातात हे लक्षात घेवून या पार्कमध्ये आहार, विहार, आचार, शारिरीक सवयी, मानसिक आरोग्य यावर भर देवून खेळातून प्रबोधन करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button