एसटी महामंडळाच्या वाहतुकीद्वारे आंबा बागायतदारांना राज्यातील बाजारपेठ खुली
एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कोठेही आंबा वाहतूक केली जाणार आहे. थेट आंबा बागायतदार, व्यापार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडील आंबा वाहतूक केला जाणार आहे. या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली होणार आहे.
येत्या आंबा हंगामात रत्नागिरी विभागातून आंबा वाहतूक करण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत आहेत. आंबा बागायतदार आणि खरेदीदार या दोघांचाही फायदा विचार या योजनेत आहे. थेट बागेतून किंवा पॅकींग हाऊसमधून आंब्याच्या पेट्या उचलणे एसटीने निश्चित केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे, एकाच व्यापार्याकडे सर्व माल उतरविणे, शहरातील विविध भागात ट्रक जाऊ शकेल, अशा ठिकाणी माल उतरविणे, असे पर्याय एसटीने खुले ठेवले आहेत. राज्यातील एखाद्या शहरातून एसटीकडे आंब्याची मागणी केली तर त्या ग्राहकाला थेट बागायतदाराशी जोडून देण्याचे कामही एसटी करणार आहे.
www.konkantoday.com