रिफायनरी समर्थकानी खासदार सुप्रिया सुळे व कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन निवेदन दिले
रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीजिल्ह्यातील राजापूर येथे व्हावाया मागणीसाठी रिफायनरी समर्थकांनी आता महाआघाडीच्या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे रिफायनरी प्रकल्पसमन्वय समिती व फार्ड रत्नागिरी यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व विधानसभेचे माजी अध्यक्ष , कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची मुंबई येथे भेट घेण्यात येवून निवेदन देण्यात आले . रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्या तील नाणार येथे व्हावा अशी मागणी गेले दोन वर्षेसातत्याने प्रकल्प समर्थक करत आहेत सत्ता बदल व कोरोनाचे संकटयामुळे अद्यापही ठाकरेसरकारने या मागणीचा विचार केलेलानाही . रिफायनरी हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे असे शिवसेनेकडुन वारंवार जाहीर करण्यात आले असले तरीअद्यापही प्रकल्प समर्थकांनी प्रकल्पाची आशा सोडलेली नाही .
काही दिवसापुर्वी राजापूर तालुक्या तील विविध संघटनांची एकसमन्वय समीती स्थापन करण्यात आली असून त्या समीतीच्या माध्यमातून विविध सर्वपक्षीय मंत्री , खासदार , आमदार यांच्याभेटी घेण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी यासमन्वय समितीने खासदार सुप्रिया सुळे व कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्षनाना पटोले यांची भेट घेण्यात आली. या वेळी या रत्नागिरी ग्रीनरिफायनरी प्रकल्पाची मागणी करणारे पत्रदेण्यात आले .समर्थकानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची देखील भेट मागितली आहे परंतु त्यांना अद्यापही भेट मिळालेले नाही
www.konkantoday.com