नेवरे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केली
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे येथे बिबटय़ा फासकीतअडकला होता याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिल्यावर त्यांनी भ्रमणध्वनी वरून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले तदनंतर परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व स्टाफ मौ. नेवरे येथे जावून खात्री केली असता बिबट्या फसकीत अडकलेला दिसून आला. सदर बिबट्यास कटर च्या सहाय्याने फसकी तोडून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. बिबट्यास पिंजऱ्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचे कडून तपासणी करून घेतली व तदनंतर सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडले . सदर चे रेस्क्यू ऑपरेशन हे मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी श्री. दिपक पोपटराव खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीम. प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल पाली श्री. गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी श्री. म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी श्रीम. मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले श्री. सा. रं. पताडे यांनी पार पाडली.
www.konkantoday.com