आरटीपीसीआर लॅबबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांचा सूचक इशारा

0
37

आरटीपीसीआर लॅबबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सूचक विधान भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केले आहे. लॅबला परवानगी व निधी, त्याचा विनियोग, आवक-जावक क्रमांकाशिवाय औषधांच्या ऑर्डर्स देणे आदींसंदर्भात कागदपत्रांसह माहिती जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात आमदार रवींद्र चव्हाण यांनी हा प्रश्‍न अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करू असे सांगितले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या वेळीच भाजपच्या वतीने आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांनी सर्व आमदारांच्या निधीतून अद्ययावत लॅब उभारणी करावी, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्याला सत्ताधारी महाविकास आघाडीने केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर बर्‍याच दिवसांनी आरटीपीसीआर लॅबला शासनाने मंजुरी दिली आणि एक कोटी रुपयांचा निधी दिला.
लॅबला मिळालेली मंजुरी, येथील मशिनरी, तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सकांना अंधारात ठेवून आवक-जावक क्रमांकाशिवाय औषधांची मागणी नोंदवणे या प्रकाराबाबत काही कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यात गैरव्यवहार करण्यात आल्याचे यात दिसत आहे, लवकरच यासंदर्भात अधिक माहिती जाहीर करू, असा इशारा अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here