राजापूरतालुक्यातील उपळे प्रिंदावण रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये रानगवा मृतावस्थेत सापडला

राजापूरतालुक्यातील उपळे प्रिंदावण रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये रानगवा मृतावस्थेत सापडल्याची माहिती राजापूर वनविभागाने दिली आहे. सदरचा रानगवा मानेवर उलटा पडुन मृत झाला असल्याचा अहवाल पशुवैद्यकिय अधिकाऱ्यानी दिला आहे. मात्र तो वहानाची ठोकर लागून पडला की कसे हे स्पष्ट झालेले नाहीयाबाबत राजापूर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 15/04/2024 रोजी दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास उपळे प्रिंदावन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये रानगवा वन्य प्राणी मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती उपळे पोलिस पाटील महेश जानु कांबळे यांनी वनपाल राजापूर यांना फोन वरून माहीती दिली. त्यानंतर सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवले.सदरचा मृत गवा हा मानेवर डाव्या बाजूला पडुन पुढे वीस ते बावीस फुट अंतरावर खाली घसरत रस्त्याच्या नाल्यांमध्ये मानेवर पडला असल्याचे दिसून आले तर घसरत असताना झाडाचे काटे पोटावर लागल्याच्या खुणाही दिसुन आल्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button