अभिनेते राजेश देशपांडे यांनी राजापूर येथील नाट्यगृहाची पाहणी केली
मराठी चित्रपट क्षेत्रातील आघाडीचे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते राजेश देशपांडे यांनी नुकतीच राजापूर नगर परिषद कार्यालयाला भेट दिली त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. जमीर खलिफे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी नुतनीकरण केलेल्या नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाची पाहणी केली. राजापुरातील. न.प.चे नाट्यगृह आता प्रेक्षकांसाठी सज्ज झाल्याने मुंबईतील निर्माते मंडळींशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करू असेही देशपांडे यांनी सांगितले.
www.konkantoday.com