गुहागरमध्ये चोरट्यांनी दोन रात्रीत केली 6 ठिकाणी चोरी

गुहागरमध्ये चोरट्यांनी दोन रात्रीत 6 ठिकाणी डल्ला मारला आहे. यामध्ये 4 मंदिरातील दानपेट्या तर एका ठिकाणी गॅरेज आणि घरफोडी अशा एकूण 6 ठिकाणी चोरी झाली आहे. ही घटना बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस घडली. यामध्ये आरे येथील श्रीराम मंदिर, श्री दत्त मंदिर वरवेली, मराठवाडी येथील श्री हसलाई देवी मंदिर व पालशेत येथील श्री गणेश मंदिर अशा चार ठिकाणी चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या. सर्व मंदिरातील गाभार्‍यांचे टाळे फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये हसालाई मंदिरात असेलेल्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये चोरटे व्यवस्थित दिसत नाहीत. या घटना घडल्यानंतर दुसर्‍या दिवशी गुरुवार दि. 11 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी पुन्हा गुहागरातील शृंगारतळी वेळंब येथे मंगेश जाधव यांचे गॅरेज फोडले. याबाबत मंगेश यांनी गुहागर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे सूर्यकांत नवलकर हे गुरुवारी सायंकाळी गॅरेज बंद करून घरी गेले होते. मंगेश जाधव हे 12 ऑगस्ट रोजी मुंबईहून शृंगारतळी येथे आले असता त्यांना आपल्या खोलीचा दरवाजा कडी-कोयंडा उचकटलेला दिसला. आत जाऊन पाहिले तर घरातील सिलिंडर तसेच ब्लू टूथ स्पिकर चोरीस गेला होता. त्यांनी गॅरेजमध्ये जाऊन पाहिले असता. तिथेही खोलीचे कडीकोयंडा उचकटून गाडीच्या दोन बॅटर्‍या चोरीस गेल्याचे दिसून आले. यात एकूण 9500 रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. या प्रकरणी जाधव यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button