
आठवडा बाजार प्रारंभी स्थानिक व्यापाऱ्यांसाठीच- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
कोरोना बाबतची सर्व खबरदारी घेऊन सर्व व्यापाऱ्यांची चाचणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आठवडी बाजार सुरु करण्याची कार्यवाही करुन महिनाभरानंतर आठवडी बाजार भरविण्याच्या दृष्टीकोणातून तयारी करा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
*येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात या संदर्भात बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, न.प. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदिंची उपस्थिती होती.
*बाहेरील व्यापाऱ्यांबाबत तपासणी शक्य होणार नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावरील व्यापाऱ्यांना तपासणी करुन घेण्याच्या अटीवर परवानगी द्यावी. या बाबत आदर्श कार्यप्रणाली निश्चित करुन नगर परिषदेतर्फे संपूर्ण शहरात त्याची प्रसिध्दी करावी असेही सामंत म्हणाले.
बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना व आठवडी बाजारातील विक्रेत्यांना मास्क वापरणे आवश्यक असेल अशी अट घालण्यात यावी असे ते म्हणाले.
सर्व पूर्वतयारी आणि प्रसिध्दी करुन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात बाजार भरवण्याची तयारी करा असे ही निर्देश त्यांनी दिले.
www.konkantoday.com