
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण स्व. धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणी
रत्नागिरी – चरित्रकार पद्मभूषण स्व. धनंजय कीर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला द्यावे, अशी मागणी मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहाय्यक संचालक आणि माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मराठी साहित्यात ज्येष्ठ लेखक चरित्रकार पद्मश्री स्व. धनंजय कीर यांचे लेखन हे अपूर्व लेणं आहे. चरित्रकार कीर यांचे जन्मगांव रत्नागिरी. शहरातील पाटीलवाडीत त्यांच घर आहे. आजच्या आणि पुढच्या पिढीला या थोर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखकाचे स्मरण चिरंतर राहावे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला त्यांचे नाव द्यावे. या उपकेंद्राला पद्मभूषण स्व.धनंजय कीर विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरी, मुंबई विद्यापीठ असे नाव देण्याची मागणी भाटकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
www.konkantoday.com