चिपळूणचे शारीख लियाकत चौगुले हे पूर्व आफ्रिकेमधील टांझानियातील नगरसेवक बनले

0
238

चिपळूण शहरातील गोवळकोटमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे माजी नगरसेवक कै. लियाकत चौगुले यांचे पुत्र शारीख लियाकत चौगुले हे पूर्व आफ्रिकेमधील टांझानियातील नगरसेवक बनले आहेत.
शारीख चौगुले आफ्रिकी देश टांझानियातील स्थानिक पक्षाकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती. गेले दोन महिने टांझानियामध्ये प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. या निवडणुकीमध्ये झालेल्या एकूण मतदान 3021 पैकी शारीख यांनी 2275 भरघोस मते मिळवून विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, टांझानियामध्ये चिपळूणचा सुपुत्र नगरसेवक झाल्याने गोवळकोट येथे आनंद व्यक्त करण्यात आला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here