खैराच्या लाकडाची चोरटी तस्करी प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, चार लाखाचे लाकूड जप्त
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड भरणा नाका येथे संरक्षित वनक्षेत्रातील खैराच्या झाडाची चोरटी कत्तल करून त्याची साल काढून तसेच शासनाचे शुल्क चुकवून सदरचा खैर कात कारखान्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी ट्रक मधून नेत असताना खेड पोलिसांनी कारवाई करत हा ट्रक पकडला होता याप्रकरणी पोलिसांनी संदेश भिसे, अरविंद काते, विजय काते, विनोद काते सर्व राहणार मंडणगड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी चार लाखाचा खैराचे लाकूड व वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे
www.konkantoday.com