अभ्यासक्रमांत सहावीपासून कोडींग अनिवार्य अशी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर ‘भारतीय जाहिरात मानक परिषदेने’ बंदी आणली
अभ्यासक्रमांत सहावीपासून कोडींग अनिवार्य अशी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर ‘भारतीय जाहिरात मानक परिषदेने’ बंदी आणली आहे. प्रामुख्याने समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणारी ही जाहिरात १५ ऑक्टोबपर्यंत बंद करण्याचे आदेश परिषदेने संस्थेला दिले आहेत.
शालेय स्तरापासून कोडिंग शिकवण्याच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यातील ओझरत्या उल्लेखानंतर अगदी पूर्वप्राथमिक वर्गापासून ‘कोडिंग’ च्या शिकवण्या सुरू झाल्या आहेत. ‘सहावी इयत्तेपासून कोडिंग अनिवार्य’ अशी जाहिरातबाजी काही ऑनलाइन शिकवण्यांकडून करण्यात येत आहे. येत्या काळात अभ्यासक्रमात विषय बंधनकारक होण्याच्या धास्तीने हजारो रुपयांचे शुल्क भरून पालकही या शिकवण्यांकडे धाव घेत आहेत.
www.konkantoday.com