
बुरंबाड शेरवाडीतील तरूणाचा तलावात बुडून मृत्यू
दहीहंडी फोडण्यासाठी मौजमजा लुटल्यानंतर तलवात पोहोण्यासाठी गेलेला युवक सुरज सुधीर मोरे (२६) याचा तलावात बुडून मृत्यू झाला. गुरूवारी सुरज सुधीर मोरे याच्यासह २५ ते ३० मित्र दहीहंडी फोडल्यानंतर आमणारेस्वर येथील मंदिराजवळील तलावात पोहोण्यासाठी गेले होते. येथील तलावात मौजमजा केल्यानंतर त्यांच्या जवळचे मित्र निघून आले. परंतु सुरज मोरे हा घरी परतला नव्हता. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची फिर्याद नातेवाईकांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. मंदिराजवळ असलेल्या तलावाजवळ त्याची चप्पल सापडल्याने शोध घेतला असता तो मृत स्थितीत आढळून आला. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात भाऊ चेतन सुधीर मोरेनी खबर दिली. या घटनेची माहिती मिळतास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित, पोलीस मुडगर, चव्हाण, निरगुडे आदींनी घटनास्थळी जावून तपास केला. www.konkantoday.com