
नाणार येथील रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या-,माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर
नाणार येथील रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सरकारने विचारात घ्यावा, असेही सुखथनकर यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलचा विचार लवकर व्हावा, असा सल्ला सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
www.konkantoday.com