केेंद्राची महावितरणला सापत्न वागणूक ,महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोशियनचा आरोप
घरगुती ग्राहकांना छपरावरील सौर यंत्रणा स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाच्या नवीन व नुतनीकरणीय उर्जा मंत्रालयातर्फे अनुदान दिले जाते. एप्रिल २०१९ पासून महाराष्ट्रात सौर यंत्रणांना अनुदानाची कोणतीही योजना नाही. यापूर्वीच्या ५० मेगावॅट क्षमतेच्या योजनेला महाऊर्जा मार्फत यशस्वीरित्या पूर्ण होण्यास ५ महिन्यांचा अवधी लागला होता. परंतु महावितरणने राज्यासाठी केवळ २५ मेगावॅट क्षमतेच्या अनुदानाची मागणी केली होती. परंतु केंद्र शासनाने आकाराने लहान असलेल्या गुजरातच्या वीज कंपन्यांनी ६०० मेगावॅट क्षमतेची परवानगी देवून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने केला आहे.
konkantoday.com