गोकुळच्या दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ

गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसत आहेत, सतत वाढत गेलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव यातच आता सामान्यांना आणखी अडचण वाढणार आहे, गोकुळने आपल्या दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ केली आहे.गोकूळ संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोकूळ दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता गोकूळ दूधसंघानं दुधाच्या दरात 4 रुपयांनी वाढ केली आहे शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याचं कारण देत दरवाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता गोकूळल्या म्हशीच्या दुधाची किंमत 58 रुपये प्रतिलिटर झाली असून, हे दर उद्या 16 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
दरम्यान गोकुळच्या फुल क्रिम, प्रमाणित, गाय आणि टोण्ड दुधाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button