चिपळूण येथे उपोषणाला बसलेल्या कामगारांना बाळा कदम यांनी न्याय मिळवून दिला
मागील दोन दिवस चिपळूण आगारात आमरण उपोषणास बसलेल्या कामगार सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीला शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनीच धाव घेऊन संबंधित यंत्रणेला धारेवर धरत उपोषणकर्ते माने यांना न्याय मिळवून दिला आहे.
येथील महामंडळाच्या रत्नागिरी कामगार सेनेच्या कामगारांवरील अन्याय सहन करणार नाही असा इशारा देताना याचा आगारप्रमुखाना जाब विचारताच पगार मिळवून देण्याचे लेखी आश्वासन आगाराप्रमुखांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले असून बाळा कदमाच्या दणक्याने महामंडळ रत्नागिरी विभागाची यंत्रणा मात्र ताळ्यावर आली .
शिवसेना कामगार सेनेचे माजी विभागीय उपाध्यक्ष आणि चिपळूण आगाराचे चालक श्री सूर्यकांत माने हे जून महिन्याचा अठरा दिवसाचा पगार न मिळाल्याने आमरण उपोषणास बसले होते
www.konkantoday.com