पॅकेजिंग तज्ज्ञ डॉ. आरती मुंडे गुर्जर यांनी एक महत्त्वपूर्ण संशोधन, निर्माण केली विघटन होणारी ’बायो-प्लास्टिक फिल्म’


जगभरात प्लास्टिक प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून विशेषतः अन्नप्रक्रिया उद्योगातून निर्माण होणार्‍या प्लास्टिक कचर्‍याची समस्या मोठी आहे. या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी रत्नागिरीच्या रहिवासी असलेल्या पॅकेजिंग तज्ज्ञ डॉ. आरती मुंडे गुर्जर यांनी एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांनी ’कसावा’ (तापीओका) या कंदाच्या स्टार्चपासून जैवविघटनशील (बायोडिग्रेडेबल) ’प्लास्टिक फिल्म अर्थात विघटन होऊ शकणारे प्लास्टिक विकसित केले आहे. ही फिल्म पारंपारिक
प्लास्टिकला एक सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर ठेवला आहे.
डॉ. मुंडे-गुर्जर यांनी आपल्या प्रयोगामध्ये ५० टक्क्यांपर्यंत कसावा स्टार्चचा वापर करून ही फिल्म तयार केली आहे. या संशोधनासाठी भारतीय मानक संस्थेच्या (इखड) ’आयएस-९८४५ : १९९८’ मधील कठोर अटींचे पालन करण्यात आले. फिल्मची ताणण्याची क्षमता, जाडी, पारदर्शकता आणि आर्द्रता रोखण्याची क्षमता अशा विविध यांत्रिक व भौतिक निकषांवर ही फिल्म तपासली गेली. चाचणीसाठी ३ टक्के ’सिटिक सीड’चा वापर करून अन्नपदार्थांशी होणारी तिची अभिक्रिया तपासण्यात आली. ज्यामध्ये ही फिल्म पूर्णतः सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button