शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदार एक सप्टेंबरपासून धान्य वितरण बंद करणार
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून धान्य दुकानदारांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन थेट पावतीद्वारे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरीत करण्यासाठी पुन्हा आदेश करावेत. अन्यथा १ सप्टेंबर पासून राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे अशोकराव कदम यांनी जिल्हाधिकारी यांना काही दिवसांपूर्वी दिलेल्या निवदेनाद्वारे दिला होता.मात्र, याकडे शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रेशन दुकानदारांनी एक सप्टेंबरपासून धान्य वितरण बंद’चा निर्णय कडकडीत पाळावा असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केले आहे.
www.konkantoday.com