सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील एसटी बसस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीयेथील एसटी बसस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण होणार आहे. येथे मोठे व्यापारी संकुल आणि इतर सुविधांची निर्मिती केली जाईल. एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी असे उपक्रम राबविण्याला प्राधान्य असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
श्री. परब यांनी कणकवली बसस्थानकाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, “”एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली आहे. सेवा स्थगित केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्पाटप्प्याने पुन्हा सेवेत घेतले जात आहे. कणकवली बसस्थानक आणि परिसरात सात एकर जागा महामंडळाच्या ताब्यात आहे
www.konkantoday.com