भाट्येबीचवर ‘आय लव रत्नागिरी’ सेल्फी पॉईंट लवकरच उभारणार-पालकमंत्री वायकर

अथांग समुद्र किनारा तसेच निर्सगाने नटलेला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात. अशा निसर्गाची खाण असलेल्या या जिल्ह्याचा कोकणवासीयांना नेहमीच अभिमान राहिला आहे. जिल्ह्याधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या १०० फुटी राष्ट्रध्वजाचे उद्घाटनही करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सौंदर्यात लवकरच आणखीन एका सौंदर्याची भर पडणार आहे. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून लवकर रत्नागिरीतील भाटयेबीचवर ‘आय लव रत्नागिरी’ हा सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून या सेल्फी पॉईंटला पालकमंत्री यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्हा नियोजनमधील नाविन्यपुर्ण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याला नविन रुप देण्याचाही प्रयत्न केला. यात ऍक्टीव्हीटी सेंटर, ओपन जिम, नेहरु तारांगणाच्या धर्तीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण, रत्नागिरी, चिपळूण तसेच लांजा येथील एस.टी स्थानकाचे नुतनीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वॉटर प्युरिङ्गायर मशिन बसविले, पर्यटनस्थळांचा विकास, जिल्ह्यात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविणे, अशा एक ना अनेक सोयी सुविधा देऊन जिल्ह्याचा विकास केला.

जिल्हा नियोजनमधील नाविन्यपुर्ण योजनेच्या माध्यमातून २०१९-२० या वर्षासाठी जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ व्हावी तसेच जिल्हावासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अजुन नविन योजनांना मंजुरी दिली आहे. यात रत्नानिरी येथे नाविन्यपुर्ण योजनेतून ‘आय लव्ह सेेल्फी’ पॉईंट उभारण्यात येणार आहे. तसेच भाट्येबीचवर ‘गझिबो’ उभारण्याबरोबरच त्याबाजुचा परिसर सुशोभिकरणासाठी रुपये ५० लाख मंजुर केले आहेत. तसेच या बीचवर येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रत्नागिरी शहरात अनुक्रमे सुसज्ज पोलिस चौकी तसेच सी.सी.कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिस चौकीसाठी रुपये ५० लाख तर सी.सी.कॅमेरासाठी रुपये ५० लाख मंजुर केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या १०० फुटी राष्ट्रध्वजाच्या सभोवतालील परिसराच्या सुशोभिकरणासाठी रुपये २५ लाख तसेच कसबा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या सभोवतालील विद्युतीकरण तसेच हायमास्ट लाईटची व्यवस्था करण्याच्या कामासाठी रुपये २५ लाख इतक्या निधीला रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मंजुरी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button