राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविल्यानंतर रत्नागिरी प्रशासनाने खुलासा न केल्याने व्यापार्‍यांच्यात संभ्रम

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत जाहीर केल्यानंतर गेल्यावेळच्या लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल केले आहेत. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्याकरिता नियमाची माहिती न दिल्याने व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. मिशन बिगीन अगेनखाली राज्य शासनाने या लॉकडाऊनमध्ये काही सवलती दिल्या होत्या. परंतु काही नियमांबाबत स्थानिक पातळीवर प्रशासनाला अधिकार दिले होते. यामुळे प्रशासनाने दुकानांच्या वेळेबाबत व या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या अन्य सवलतींबाबत जनतेच्या माहितीसाठी लेखी आदेश देणे गरजेचे होते. परंतु हे जाहीर न झाल्याने दुकानांत वेळेबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु मागील लॉकडाऊनमध्ये ठरलेल्या प्रमाणेच सकाळी ९ ते रात्री ७ ही दुकानाची वेळ राहणार आहे. रत्नागिरीत त्यामुळे काही व्यापारी वेळ उलटली तरी दुकाने उघडी ठेवत होते. याउलट सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांनी शिथिल झालेल्या नियमांबाबत व दुकानांच्या वेळेबाबत तसेच या लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या अन्य सवलतींबाबत स्वतः जातीने स्पष्टीकरण दिल्याने त्या ठिकाणी मात्र संभ्रम होण्यास वाव मिळालेला नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button