सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला
सिंधुदुर्ग पोलिस दलाने संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून जिल्हा सुरक्षित केला आहे. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून या जिल्ह्याचा आदर्श अन्य जिल्हे घेतील, असा विश्वास राज्याचे गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी सीसीटिव्ही संनिरिक्षण प्रकल्पाच्या प्रारंभ प्रसंगी केले.
सीसीटिव्ही कॅमेरा संनिरीक्षण प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात राज्याचे गृह राज्यमंत्री देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, नागेंद्र परब, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com