राज्यात काल १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे

राज्यात काल १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. काल देखील नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे. तर आज ७७१७ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button