भारतीय जैन संघटने च्या वतीने प्लाज्मा डोनर्सची यादी शासनाकडे सुपूर्द करण्याचा संकल्प

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. वास्तविक पाहता कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो, यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे आपल्याला जीवनदान मिळू शकते व त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
सध्या केंद्र व वेगवेगळ्या राज्य शासनातर्फे कोरोनाच्या संदर्भात प्लाज्मा थेरपीवरती गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरु आहे. या प्रक्रियेसाठी थोडा कालावधी लागू शकतो. या कालावधीत प्लाज्मा डोनर्सला शोधण्याचे व त्यांची संमती घेण्याचे काम सुरु केले तर कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळू शकते.
या अनुषंगाने भारतीय जैन संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात “बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजने” च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. यासाठी किमान १७ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती, कोरोना आजारातून बरे होऊन किमान दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे आणि इतर कोणतेही गंभीर आजार नसलेल्या व्यक्तीच प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. तरी भारतीय जैन संघटना रत्नागिरी च्या वतीने सर्व कोरोना योद्ध्यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र कोव्हीड मुक्त करण्यास वचनबद्ध आपण आपला प्लाज्मा दान करून एक पुण्याचे काम करावे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांनी प्लाज्मा डोनेशन करण्यासाठी संमती पत्र भरुन द्यावे असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महेंद्र गुंदेचा, दिलीप संघवी, मुकेश जैन, अरविंद जैन, संजीव जैन, ललित शहा तसेच
रत्नागिरी – लांजा-राजापूर तालुका:-
सुरेश जैन 70208 58153 दापोली -मंडणगड तालुका :-चेतन जैन 94222 82824,योगेश जैन 82753 92322 चिपळूण -गुहागर तालुका :- देवीचंद जैन 94232 94676 ,दिलीप जैन 98221 29623 खेड तालुका :- उत्तम जैन 9422344851, दिपक जैन 94224 29252 संगमेश्वर तालुका :- मिलींद मांगले 94201 53195,दिपक नरोटे 94223 82782 यांनी केले आहे. संमतीपत्र प्राप्त करण्यासाठी कोव्हिड मुक्त झालेल्या रुग्णांशी संपर्क करण्यास उत्सुक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जैन संघटना, रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष महेंद्र गुंदेचा 9422429599 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button