
नियमांचे पालन करुन भक्तांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार -परिवहन मंत्री अनिल परब
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने खुशखबर दिली आहे. नियमांचे पालन करुन भक्तांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करणे शक्य असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. ‘एसटीची सेवा तर उपलब्ध होईलच. त्यामुळे लोकांना एसटी उपलब्ध करून द्याव्या लागतील. पण अटी शर्थींची पूर्तता करुन हे सर्व करावं लागेल.
www.konkantoday.com