रत्नागिरीतील पहिल्या खासगी अँटीजेन टेस्ट लॅब खेड येथे उद्घाटन

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली खासगी अँटीजेन टेस्ट लॅब खेड तालुक्यातील घरडा रुग्णालयात सुरु करण्यात आली असून या लॅबचे उद्धाटन खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या हस्ते आज करण्यात आले. या खासगी टेस्ट लॅबमुळे कोरोनाबाधिताचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे सुलभ होणार आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. एखाद्या व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरु करता येणार आहेत. परिणामी कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखणे शक्य होणार असल्याने लवेल येथील रतनबाई घरडा रुग्णालयात खासगी अँटीजेन टेस्ट लॅबला परवानगी मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. शासनाने या लॅबला मान्यता दिली असल्याने आज खेडचे प्रातांधिकारी अविशकृमार सोनोने यांच्या
हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमध्ये कोरोना संशयित रुग्णांची अँटीजेन टेंस्ट केली जाणार असल्याने कोरोनाची लागण झालेले रुग्ण शोधणे सोपे झाले आहे. रत्नागिरी शासकिय रुग्णालयात स्वॅब तपासणी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र कोरोना संशयितांची संख्या जास्त असल्याने या यंत्रणेवर ताण येत होता. आता खेड येथील घरडा रुग्णालयात खासगी अँटीजेन टेस्ट केली जाणार असल्याने या शासकिय रुग्णालयातील स्वब तपासणी यंत्रणेवरचा ताण कमी होणार आहे.
या लॅबच्या उद्घाटन प्रसंगी घरडाचे रामकृष्ण कुलकर्णी, एच आर विभागाचे अनिल भोसले, खेड तालुक्याचे
गटविकास अधिकारी पारशे , नोडल अधिकारी डॉ. चेतन कदम आदी उपस्थित होते.अँटीजेन टेस्ट लॅबसाठी घरडा हॉस्पिटलने घेतलेल्या पुढाकाराबद्दल प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने यांनी संबधितांचे कौतुक केले व सर्व मिळून कोरोनावर लवकरच मात करू असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button