ग्रामीण भागातील संशयित कोरोना रूग्णांच्या तपासणीसाठी आता ऑक्सिजन मीटरची मदत घेणार
रत्नागिरी जिल्ह्यात शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोना रूग्ण सापडत असून तो एक चिंतेचा विषय झाला आहे. यासाठी आता ग्रामीण भागातील संशयित रूग्णांची प्राथमिक तपासणीसाठी ऑक्सिजन मीटरच्या माध्यमातून तपासणी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये शहरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे महत्वाचे लक्षण आहे. त्यामुळे ऑक्सिजन पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाद्वारे ते मोजता येते. त्यामुळे आता ग्रामीण स्तरावर अशा पल्स ऑक्सीमीटर खरेदी करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी ग्रामपंचायतीने स्वतःच्या निधीतून अथवा चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करावयाचा आहे.
www.konkantoday.com