राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरूद्ध यांनी शरद पवार यांची मुंबईत सिलव्हर ओक येथे भेट घेतल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगल्या


चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या बाबातीत ही एक बातमी समोर आली आहे. निकम यांचे सुपुत्र अनिरूद्ध यांनी अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत सिलव्हर ओक येथे भेट घेतली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेतराज्याच्या राजकारण मध्यंतरी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंद केले. यावेळी येथे थेट निवडणूक शरद पवार विरूद्ध अजित पवार असाच अनेक ठिकाणी लढत पहायला मिळाली. तेंव्हाही निवडणुकीच्या तोंडावर अनिरूद्ध यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.अनिरूद्ध यांनी ऑस्ट्रेलियातून कृषी विषयातून उच्च पदवी घेतल्यानंतर या क्षेत्रातील जाणकार शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली होती. आताही रविवारी (ता.11) पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष: अनिरूद्ध यांना स्वत: शरद पवार यांनीच बोलावून घेतल्याचे आता समोर येत आहे. दरम्यान पक्ष फुटीनंतर अनिरूद्ध यांनी शरद पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेतल्याने आता चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र रविवारच्या भेटीत दोघांमध्ये कोणती चर्चा झाली? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button