ग्रीन फीलमधून कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न साकारूया, महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचे जनतेला आवाहन

ग्रीन फीलच्या माध्यमातून कोकणच्या कॅलिफोर्नियाचे स्वप्न या महायुतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी साकारूया, असे आवाहन महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी जनतेला केले.ज्या समाजाचे नेतृत्व केले त्या समाजासाठी काही न करणारे अनंत गीते या समाजाच्या भवन उभारणीसाठी भूखंड मिळवू शकले नाहीत. त्या कुणबी भवन उभारणीसाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पातून ५ कोटी निधी दिला. तसेच मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांनी ७ कोटी रुपये निधी दिला. त्यामुळेच या भवनाची इमारत उभी राहिली असून अनंत गीते यांचा यामध्ये एक टक्काही हिस्सा नाही, त्यामुळे त्यांनी समाजाच्या नावाने मते मागू नयेत, अशी टीकाही महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button