
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या ४३ किलोमीटर टप्प्यातील ९५ टक्के काम पूर्ण
महामार्ग चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या ४३ किलोमीटर टप्प्यातील ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. फक्त कुडाळ आणि कणकवली शहरातील काम शिल्लक राहिले आहे. दरम्यान, शहरातील उड्डाणपुलाच्या भिंतीचा जो भाग कोसळला आहे, तो नव्याने बांधून देण्याचे निर्देश महामार्ग ठेकेदाराला दिल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी दिली.
चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात दोन टप्प्यात सुरू आहे. यातील कणकवली शहर ते झाराप या ४३.९०५ किलोमीटरपैकी ४०.२९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कणकवली आणि कुडाळ शहरातील प्रत्येकी दीड किलोमीटरचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
www.konkantoday.com