
देवगड बंदरात गुजरातमधील सुमारे शंभर मच्छीमारी नौका आश्रयाला
वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे, तसेच समुद्रातील खराब हवामान यामुळे पुन्हा येथील मच्छीमारी थंडावली आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग येथील देवगड बंदरात गुजरातमधील सुमारे शंभर मच्छीमारी नौका आश्रयाला आल्या आहेत. किनारपट्टीवर पावसाने जोर धरल्याने मच्छीमारी नौका आश्रयासाठी बंदरात आल्या. त्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून नौकांची तपासणी करण्यात आली
www.konkantoday.com