कोकणात आज पासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज

यंदा राज्यात मान्सून जूनमध्ये वेळेवर हजर होईल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला होता. मात्र, जूनच्या सुरुवातीलाच ‘निसर्ग’ या चक्रीवादळामुळे नंतर काही दिवस राज्यातील आद्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक भागात पावसाने पाठ फिरवली होती. गेल्या आठवड्यात कोकणासह मुंबईत जोरदार हजेरी लावली होती.
राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात आज पासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button