कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला, आ. नितेश राणे यांनी अधिकार्यांना धरले धारेवर.
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली येथे बांधण्यात येणार्या महामार्ग उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर या प्रश्नावरून आ. नितेश राणे आक्रमक झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, महसूल अधिकारी व ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले. मुंबई-गोवा महामार्गावरील काही भागात महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत लोकांनी वेळोवेळी तक्रारी करून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आजच्या प्रकारानंतर जनतेतील असंतोष बाहेर आला. आ. राणे यांनीदेखील आक्रमक भूमिका घेवून अशा प्रकारामुळे उद्या जीवीत हानी झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करून हे काम करणार्या दिलीप बिल्डकॉन या ठेकेदारावर कारवाई करा. महामार्गाचा व उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
www.konkantoday.com