
बेदरकार रिक्षा चालवून उभ्या असलेल्या रिक्षाला दिली धडक; रिक्षा चालकावर गुन्हा
रत्नागिरी : उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून धडक देत अपघात करणार्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात सुरज अशोक पवार (20,रा.खेडशी, रत्नागिरी ) हा प्रवासी जखमी झाला आहे. ही घटना रविवार 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3.45 वा. मारुती मंदिर येथील करमरकर हॉस्पिटल समोर घडली. समीर बाशासाब जमादार (मूळ. रा. कर्नाटक सध्या रा.पानवल, रत्नागिरी) या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला. रविवारी जमादार आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एआर-4286) घेऊन भरधाव वेगाने कुवारबाव ते एसटी स्टॅन्ड असा जात होता. तो करमरकर हॉस्पिटलसमोर आला असता त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसर्या रिक्षेला पाठीमागून धडक दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.