
जिल्हा प्रशासनात रिक्त पदे असताना बदलीचा घाट कशासाठी?
रत्नागिरी जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त असताना देखील रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनातील ग्रामपंचायत, शिक्षण, बांधकाम, पुरवठा, आरोग्य, कृषी विभागातील परजिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या बदलीचे आदेश निघत असल्याचे वृत्त आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सध्या नाशिक, सातारा, उस्मानाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी असलेले अधिकारी असून त्यांच्या बदलीसाठी आदेश काढले असल्याचे कळते. पदे रिक्त असताना बदलीचा घाट कशासाठी? असा सवाल जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्यानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com