
मिरकरवाडा अंडरआर्म स्टेडियम निविदा वादात
मिरकरवाडा मत्स्योद्योग वसाहतीतील ओपन स्पेसमध्ये अंडरआर्म स्टेडियम बनवण्याची संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करावी, त्याचबरोबर हे काम सुरू केले जावू नये, यासाठी स्थगिती मिळण्याच्या मागणीसाठी एका मक्तेदाराने न्यायालयात दावा दाखल केला आहे. यावर गुरूवार दि. १५ रोजी होणारी सुनावणी आता २३ रोजी न्यायालयात होणार आहे.
हे स्टेडीयम सुमारे दीड कोटी रुपये खर्चाचे आहे. न्यायालयात गेलेल्या ठेकेदाराच्या निविदेच्या दस्तऐवजामधील प्रतिज्ञापत्रावर सही नसल्याने मुख्याधिकार्यांनी त्यांची निविदा अवैध ठरवली आहे. मिरकरवाडा येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती, नगरोत्थान महाअभियान, जिल्हास्तर योजनेतून अंडरआर्म स्टेडियम विकसित करण्याबाबतची निविदा प्रक्रिया झाली. ऑगस्ट महिन्यात आलेल्या निविदांचे लखोटे उघडले होते. त्यामध्ये महेश गडेकर यांच्या निविदेतील दस्तऐवजामध्ये असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही नव्हती. यामुळे मुख्याधिकार्यांनी ती निविदा अवैध ठरवल्याने दुसर्या मक्तेदाराला या स्डेडियमचे काम मिळाले आहे. ही निविदा अवैध ठरवण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगत या मक्तेदाराने मुखत्यार प्रथमेश सावंत यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणी १५ ऐवजी न्यायालयात सुनावणी होणार होती. आता ती २३ जानेवारी रोजी होणार आहे.www.konkantoday.com




