पाली बाजारपेठेत जुन्या महामार्गाच्या दुतर्फा असणारी उघडी गटारे धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये पाली (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत भूसंपादित केलेल्या भागातील बाधित होणारी काही बांधकामे पाडण्यात आली आहेत. तेथे आवश्यक तेवढ्या नव्या महामार्गाच्या रुंदीसाठी जमीन सपाटीकरण करण्यात आले आहे. परंतु काही ठिकाणी जुनी बांधकामे अद्यापि तशीच आहेत. त्यामध्ये जुन्या महामार्गाच्या दुतर्फा असणारी उघडी गटारेही तशीच आहेत. त्यामध्ये महामार्गावरून जाणारी वाहने बाजूपट्टीवर घेताना गटारात जाऊन अपघात घडत आहेत. पावसाळ्यात हा धोका वाढणार आहे.
www.konkantoday.com