
दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूंचे इतर निधीतून वाटप करावे -आ. शेखर निकम यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार व इतर आवश्यक साधनांची ५ टक्के जि.प. सेस अंतर्गत निधीतून तसेच जीवनावश्यक वस्तूंचे इतर निधीतून वाटप करावे, असे निवेदन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अनिल परब यांना दिले आहे.
दिव्यांगाना सध्या जि.प. अंतर्गत फंडातून अन्न व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येते त्यासाठी दिव्यांग बांधवांना फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मची मुदत ३० जूनपर्यंत आहे. या फॉर्मवर सरपंच, ग्रामसेवक यांची स्वाक्षरी तसेच उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी तलाठी यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर विविध जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते उपलब्ध होवू शकत नाहीत. त्यामुळे फॉर्मची पुर्तता करण्यासाठी दिव्यांगाना त्रास होत आहे. याचा शासनाने विचार करून अन्य निधीमधून त्याची पुर्तता करावी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
www.konkantoday.com