
खळबळजनक! नाटे पोलिस ठाण्यात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न
राजापूर : नाटे सागरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक मंगेश सीताराम राडये यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या या प्रकाराने राडये यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्यांना अटक करून राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. नाटेचे सहायक पोलिस निरीक्षक आबासो नंदकुमार पाटील यांनी नाटे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राडये याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास राजापूरचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर करत आहेत.