मला भावलेला कोकणचा हीरा ” वैभव मांगले”

0
448

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण आपापल्या घरी होताच अशाच एका दुपारी मी आणि माझी पत्नी विद्या टाईमपास म्हणून पत्ते खेळत बसलो असताना सुनील बेंडखळे याचा फोन आला आणि म्हणाला काका घरी आहात ना आम्ही येतोय मी म्हटल हो या.सुनील बेंडखळे म्हणजे संगमेश्वरी बाज मधला जबरदस्त कलाकार आणि माझा खूप आवडता त्यामुळे दुपार असूनही मी नाही म्हणू शकलो नाही बरोबर तीन वाजले आणि सुनील आला आणि पाठोपाठ माझा बालमित्र तोही नाट्य कलाकार प्रफुल्ल घाग मलाही आनंद झाला.मी दोघांनाही बसण्याचा आग्रह केला पण ते बसायला तयार नव्हते अजून एक आपला मित्र येतोय.मी देखील खुर्चीत बसून दरवाजाकडे बघत राहिलो पण कोरोनामुळे मास्क लावलेली एक हाफ पैंट घातलेली व्यक्ती आत आली.मी सर्वांना बसायला बोललो ती व्यक्तीही बसली आणि आलेल्या व्यक्तीने मास्क खाली घेतला आणि मी खुर्चीतल्या खुर्चीतच उडालो कारण ती व्यक्ती होती आमचा मित्र कोकणचा स्टार वैभव मांगले खरच मला खूपच आनंद झाला मी सुनील आणि प्रफुल्ल कड़े आश्चर्याने बघतच राहिलो प्रत्यक्षात स्टार कलाकार वैभव आपल्या घरी तोही माझ्या बालमित्र प्रफुल्ल घाग याच्यामुळे आला होता. विषय होता लॉकडाऊनच्या दोन महिने वैभव देवरूख येथील आपल्या घरी आलेला होता त्यामुळे स्थानिक कलाकारांना घेऊन एक सिरीयल करणार होता कथा लेखक हा प्रफुल्ल घागचा मोठा भाऊ राजू घाग ज्याने रात्रीत खेळ चाले या सिरीयल ची कथा लिहिलेय त्यानेच ही कथा लिहिली आहे.झीटिव्हि ने ही जवाबदारी वैभववर टाकली आहे आणि माझा नाचणे गांव व परिसर निश्चित केला आहे आणि यासाठी ते माझ्या कडे आले होते.मी देखिल खुश झालो कारण एवढा मोठा कलाकार माझ्या गावात येऊन स्थानिक कलाकारांना घेऊन सिरियल करणार म्हटल्यावर सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मी मान्य केल आणि सर्व परवाने मिळाल्यानंतर शुटिंग सुरू झाले आणि मला वैभव भावला कारण वैभव सर्व नवोदित कलाकारांना घेऊन ज्या पध्दतीने जबाबदारी पार पाडत आहे हे बघून त्याच्याबाबतीत जे मत माझ्या मनात बिंबवले होते त्याच्या विरुद्ध वैभव मला अनुभवायला मिळाला.याचे कारणही तसच होत वैभव सर्वप्रकारचे रोल यावेळी साकारताना दिसला यामधे दिग्दर्शन,नवोदित कलाकारांचा पालक मार्गदर्शक आणि वेळप्रसंगी रागिष्ठ होत होता. असे अनेक रोल करताना मी वैभवला बघितले कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना स्थानिक मिळतील ते कलाकार मंडळी,साहित्य, लोकेशन यांना घेऊन ही सिरियल करण्याचा विडा प्रफुल्ल घाग,समीर ईंदुलकर, आप्पा रणभीसे,सुनील बेंडखळे.तर डिरेक्टर ही अत्यंत कठीण कामाची जबाबदारी निखील पाडावे याने तर
संपूर्ण शूटिंगची जबाबदारी कॅमेरामन प्रसाद पिलणकर यांनी उचलली होती.ज्या नाट्यक्षेत्रात कलेची आवड असणार्या कलाकारानी यात चांगली मेहनत घेत यांना साथ दिली त्या प्रत्येकाला वैभव संभाळून घेताना दिसला.सेट लावायचा कसा, भाषा कशी वापरायची, बोल कसे बोलायचे ईथपासून ते लायटिंग कसे लावायच हे प्रत्येकाला समजावून सांगण्याची पध्दत आपुलकिची पण एखादा टंगळमंगळ करायला लागला तर शूटिंग संपल्यानंतर मात्र कठोर शब्दानेही समजवण्याची तयारी ठेवावी लागत असे. एकुणच काय तर वैभव मांगले आम्हाला चौरंगी भूमिकेत पहायला मिळाला. मित्रानो कोकणचे मालवणी सम्राट कै मच्छिंद्र कांबळी यांनी जस मालवणी भाषेवर प्रभुत्व मिळवल तोच अनूभव वैभवच्या रत्नागिरीतील संगमेश्वरी बोलीच्या बाबतीतला आहे.अतिशय सहजरित्या वैभव ही भाषा बोलतोय आणि म्हणूनच कै मच्छिंद्र कांबळी यांच्या नंतर नाट्य,टिव्ही क्षेत्रात कोकणचा स्टार म्हणून वैभव उदयाला आला आहे आणि हां अनूभव मी घेतोय.कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता झी टीव्ही सारख्या चॅनलच्या सहाय्याने वैभवने प्रफुल्ल घाग ,समीर ईंदुलकर सारख्या मित्रांच्या आग्रहाने रत्नागिरीतील नवोदित कलाकारांना फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अगदी माझ्या सारख्याला सुध्दा छोटा रोल करण्याचे भाग्य मिळाले अनेक कलाकारांना प्रफुल्ल ने फोनवरून संपर्क केला पण काहीनी काहीतरी कारण सांगून नकार दिला खरा पण ज्यावेळी झी वर या सिरियलचा प्रोमो सुरू झाला त्यानंतर मात्र नकार दिलेल्यांनी कपाळाला हाथ लावून घेतला आहे.पण ज्यांना आवड आहे जे कलेवर प्रेम करतात त्यांनी मात्र आपल्या मिळालेल्या भूमिका आणि सेटवरील पडेल ते काम करून मेहनत घेत आहेत १८ जूनला झी टीव्ही वर ही मालीका दाखविली जाणार आहे आणि त्या संपूर्ण सिरियल मधे माझा गांव माझ्या मित्रांची घरे,परिसर यात दिसणार आहे याचा मला अभिमान वाटतो आहे. ” एक गांव भुताचा” ही सिरियल म्हणजे एक ईतिहासच ठरणार आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा सहज उपलब्ध नसताना प्रफुल्ल घागच्या नवोदित टीमने वैभवजींच्या सहकार्याने चांगली मेहनतीमुळेच ही सिरियल १८ जूनला दाखविली जाणार आहे आणि या ईतिहासाचा खरा हिरो संबोधले आहे आमचा मित्र” वैभव मांगले असणार आहे आणि म्हणूनच मी या लेखाच्या सुरूवातील कोकणचा हिरा संबोधले आहे.ह्या सिरियलसाठी शासकीय परवाने महाराष्ट्राचे तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय श्री उदयजी सामंत साहेब यांनी तसेच रत्नागिरीचे जिलाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक,व सर्व कर्मचारी तसेच माझ्या गावातील श्री दिपक सुपल,विजय सुपल, प्रकाश सुपल, बंड्या मोरे, प्रकाश लेले,लंबोदर करमरकर,मयूरेश/मिनल सावंत,सुनील नारकर,बाणे हे सर्व आणि यांच्या कुटंबियांचे तसेच आण्णा कवितके, ग्रामपंचायत नाचणे यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल या संपूर्ण युनिटतर्फे मनपूर्वक आभार.


संतोष सावंत,नाचणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here