
चक्रीवादळानंतर तडाख्याने उद्ध्वस्त कोकणवासियांना केंद्रीय पथकाकडून मोठ्या अपेक्षा
चक्रीवादळानंतर तडाख्याने उद्ध्वस्त कोकणवासियांना केंद्रीय पथकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळानंतर हळूहळू कोकण उभं राहतंय. राज्य सरकारनं कोकणवासियांना तातडीनं मदत करून मोठा दिलासा दिला आहे पण ही मदत तोकडी असून आणखी मदतीची गरज आहे. या वादळानं घातलेल्या थैमानानंतर काल केंद्रातलं एक पथक कोकणात दाखल झालं आहे. या पथकानं काल अलिबाग, चौल, श्रीवर्धन परिसराची पाहणी केली.या वादळात अनेक लोकांची उद्ध्वस्त घरं, शाळा आणि बागांचं नुकसान झालं आहे.निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या रत्नागिरीतील मंडणगड आणि दापोली तालुक्यांमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज मंडणगड येथे दाखल झाले. श्री रमेश कुमार गणता यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्ह्यात पाहणी करणार आहे आज मंडणगड येथे आगमन झाल्यावर मंडणगड येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पावर पॉइंट द्वारे सादरीकरणात जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली मोठ्या प्रमाणावर घरांचे झालेले नुकसान सोबतच फळबागांचे नुकसान आणि वीज पुरवठा याबाबत विविध विषयांवर यावेळी पथकाने माहिती घेतली.
www.konkantoday.com
☔🌧Rainy season is on⛈☔
FabSeasons Reversible Waterproof Raincoat Adjustable Hood Reflector at Back Night Visibility. Pack Contains Top, Bottom Storage Bag
Price: starting from ₹ 725.00 (To buy click on below image)
