
करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर एसटीत नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला असतानाही अद्याप एकाही वारसाला नोकरीचे पत्र नाही
राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात करोनाबाधित होत असून मृत कर्मचाऱ्यांची संख्या २२८ झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर एसटीत नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला असतानाही अद्याप एकाही वारसाला नोकरीचे पत्र मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सेवेत घ्या आणि तसा प्रस्ताव सादर करा, अशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी महामंडळाच्या संबंधित विभागाला केल्या आहेत.
करोनाच्या साथीत, एप्रिल २०२० पासून ते आतापर्यंत ७ हजार ९७० कर्मचारी करोनाबाधित झाले असून २२८ जणांचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com