भोके ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी कोरोनाचे काळात चांगले उपक्रम राबविले
भोके ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी कोरोनाचे काळात अतिशय चांगले उपक्रम राबविलेले आहेत.
संपूर्ण गावामध्ये फवारणी करून निर्जंतुकीकरण केले.सर्व ग्रामस्थांना डेटाॅल साबण वाटप केले.गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप केले.कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.जिल्ह्याबाहेरुन (मुंबई पुणे) आलेल्या ग्रामस्थांची संस्थात्मक क्वारंटाईन व होमकाॅरंटाईनची काटेकोर व्यवस्था केली. बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तीची सर्व माहिती अद्ययावत ठेवली आहे.
यामध्ये विद्यमान सरपंच श्री श्रीपत मायंगडे, उपसरपंच सौ. मनस्वी मंगेश जाधव, ग्रामसेविका सौ. सरस्वती मोटे, तलाठी श्री राठोड, पोलिस पाटील श्री शितप, तंटामुक्ती अध्यक्ष संजय सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका, आशासेविका यांचेसहित माजी सरपंच मंगेश जाधव या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कोरोना ग्रामकृतीदल व वाडीकृतीदलांनी देखील अतिशय चांगले योगदान दिले. तसेच ग्रामिण पोलिस स्टेशनचे PI श्री कदम साहेब यांनी देखील कामाचे कौतुक केलेले असून बीट अंमलदार श्री साळवी व श्री झगडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
www.konkantoday.com