मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर विधानसभा आणि लोकसभा भरवा-माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
मुलांना शाळेत पाठवण्याअगोदर विधानसभा आणि लोकसभेची शाळा भरवा. मगच पोटच्या गोळ्याला शाळेत पाठवा,” असं माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटलं आहे. “कोरोनावर अजून औषध सापडलेलं नाही. त्यामुळे कोणताही आईवडील आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत,” असेही ढोबळे म्हणाले. “जेव्हा लोकसभा आणि विधानसभा सुरू होतील तेव्हाच लोकांच्या मनात कोरोनाची भीती कमी होईल,” असे ढोबळे म्हणाले.
“जीवघेण्या कोरोनावर औषध उपलब्ध नसताना कुणीही आपला पोटचा गोळा शाळेत पाठवायला तयार होईल, असे वाटत नाही. देशाची ही पुढची पिढी सक्षम राहिली पाहिजे याची जाणीव ठेवून शाळा सुरू केली पाहिजे,” असे ढोबळे म्हणाले.
www.konkantoday.com