राज्यातील सुमारे चार हजार पोलीसांनी कोरोनावर मात केली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास लोकांच्या सेवेत असणार्या राज्यातील सुमारे पाच हजार १७५ पोलीस कर्मचारी, अधिकार्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील सुमारे चार हजार पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ४० पोलीसांचा समावेश आहे. सध्या १११ पोलीस अधिकारी व ९२९ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com