मनसेने देखील सोनूवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली
राज्यात कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांसाठी करत काम करत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका करण्यात आली होती.मात्र आता मनसेने देखील सोनूवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलं असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया,
मनाचा मोठेपणा दाखवुया असं त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार असा टोला देखील अमेय खोपकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
www.konkantoday.com